Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

मंदिरात मूर्तीसमोर पुजाऱ्याची हत्या .. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली



मंगरुळपीर // मंगरूळपीर तालुक्यातील कोठारी येथे मंदिरातील पुजाऱ्याची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. सदर पुजारी हे ७१ वर्षीय असल्याचं समजत आहे. आज(२२ जानेवारी)  सकाळी ६ वाजताचे दरम्यान ही घटना घडली असल्याचे समजत आहे. किसन शिवगिरी गोरे असे या हत्या झालेल्या पुजाऱ्याचे नाव आहे. मुख्य म्हणजे अज्ञात आरोपीविरुद्ध  या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस पाटील सतीश क्षीरसागर रा. कोठारी यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. डोक्यात वार करून पुजारी किसन शिवगिरी गोरे यांची हत्या करण्यात आली आहे. कोठारी येथील मुंगसाजी महाराज मंदिरातील पुजारी किसन शिवगिरी गोरे (७१) हे मंदिरात मूर्तीसमोर पलंगावर रक्ताच्या थारोळ्यात पडले असून ते मृत पावले आहेत. शिवाय मृतकाच्या डोक्यावर वार झाले आहेत अशी माहिती कोठारी येथील भाऊराव डहाळे व पुरुषोत्तम ढगे यांनी फिर्यादिस दिली. मृतक पुजारी किसन गोरे हे कोठारी येथील मुंगसाजी महाराज मंदिरात राहत होते. याप्रकरणी मंगरूळपीर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भादंवी कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल केला असल्याचे समजत आहे.

या घटनेची माहिती पोलीसांना दिल्यानंतर घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी नंदा पाराजे, ठाणेदार रमेश जायभाये, पोलीस उपनिरीक्षक चंदनकुमार वानखडे, मंजुषा मोरे व कर्मचारी अरविंद सोनोने, महादेव सोळंके, विनोद चित्तकवार, सचिन इंगोले, रवी वानखडे यांनी घटनास्थळावर जाऊन पाहणी केली. घटनास्थळी  श्वान पथकालासुद्धा पाचारण करण्यात आले होते. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मंजुषा मोरे करीत आहेत