परळीत धकादायक घटना....
शौचालयाच्या हौदातील गँसने गुदमरून दोघांचा जागेवर मृत्यू 3 जण गंभीर
परळी // रेल्वे स्टेशनच्या जवळील उड्डाणपुलालगत असलेल्याशिवाजीनगर भागातील माणिक बाबुराव पोपळघट यांच्या घरी शौचालयाचा हौद उपसण्याचे काम करत असताना स्वच्छ करत असताना त्या शौचालयाचे हौदातील गँसने गुदमरून एक जण बेशुद्ध पडला त्याला काढताना दुसराही बेशुद्ध पडला त्या दरम्यान दोघांचा जागेवर मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे या घटनेत गुदमरून परळीच्या साठे नगर भागातील दोघा जणांचा मृत्यू झाला असून इतर तिघांवर अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयात उपचार चालू आहेत. रात्री 12 सुमारास शौचालयाचे टाकी उपसण्याचे काम हे मजूर करत होते अशी प्राथमिक माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. या घटनेत अर्जुन रमेश भालेराव (वय 20), विशाल शिवाजी लांडगे (वय 20) यांचा मृत्यू झाला आहे तर कार्तिक भीमा कांबळे, शिवाजी यादव लांडगे, विशाल रमेश भालेराव यांना अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले
शौचालयाचे टाकीचे काम करत कुठंलीच काळजी न घेतल्याने यांचा गुदमरून मृत्यू झाला असून तर तिघेजण गंभीर असल्याने अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार घेत आहेत. ही घटना परळीच्या शिवाजीनगर भागात रात्री बाराच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परळी शहरात मोठी खळबळ उडाली आहे..
Social Plugin