Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळीकरांसाठी गुडन्यूज !! शहरामध्ये 22 ठिकाणांवर राहणार, पोलिसांची थेट नजर








 ना.पंकजाताई मुंडे यांच्या विशेष प्रयत्नाने सी.सी.टी.व्ही.कॅमेरे बसविण्याच्या कामास मंजूरी महाशिवरात्री पर्यंत होणार कार्यान्वीत


परळी  बारा ज्योर्तिलिंगापैकी एक असलेल्या प्रभु वैद्यनाथा ,राज्यातील विजनिर्मितीमध्ये महत्वाच्या असलेले  परळी शहर  देशभरातून परळी शहरात दर्शनासाठी भाविक  असतात. शहरातील घडणाऱ्या घटनांवर नजर ठेवण्यासाठी नितांत  आवश्यकता होती.तसेच  उच्च दर्जाची सी.सी.टी.व्ही.यंत्रणा मंजूर झाली असून महाराष्ट्र शासन गृहविभाग व महाराष्ट्र शासन माहिती व तंत्रज्ञान विभागातर्फे यास मान्यता देण्यात आली आहे. यामुळे शहरातील प्रमुख चौकामध्ये सी.सी.टी.व्ही. बसविण्यात येणार आहेत  राज्याच्या ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ना.पंकजाताई मुंडे यांनी परळी शहराच्या विकासासाठी दिलेला शब्द पूर्ण केला आहे . 





महाशिवरात्री पर्यंत परळी शहरातील सी.सी.टी.व्ही. कार्यान्वित होणार आहे.
राज्याच्या  ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ना.पंकजाताई मुंडे तसेच  खा.प्रितमताई मुंडे यांच्या विशेष प्रयत्नामुळे दि.30 ऑक्टोबर रोजी गृहविभाग व माहिती तंत्रज्ञान विभागाची मान्यता मिळाली होती. त्या अनुषंगाने पोलिस अधिक्षक कार्यालयाने ई-निविदा प्रक्रिया पूर्ण करुन पात्र कंपनीस दि.11 जानेवारी रोजी कामाचे कंत्राट दिले आहे. सध्या हे काम युद्धपातळीवर सुरु करण्यात आले असून 45 दिवसात परळी शहरात 22 ठिकाणी सी.सी.टी.व्ही. बसविण्यात येणार आहेत. 






यात वैद्यनाथ मंदिर, राणी लक्ष्मीबाई टावर, शिवाजी चौक, मौलाना आझाद चौक, वैद्यनाथ बँक, सुभाष चौक, बसस्थानक, रेल्वेस्थानक, उड्डाणपूल, श्रीनाथ टॉकीज चौक, भगवान बाबा चौक, सरकारी दवाखाना आदी परिसरात हे सी.सी.टी.व्ही. बसविण्यात येणार आहेत. महाशिवरात्रीपूर्वी परळीची सी.सी.टी.व्ही. यंत्रणा कार्यान्वित होणार असून या सी.सी.टी.व्ही.मुळे परळी शहरात होत असलेल्या गुन्ह्यांना, इतर घटनांना आळा बसणार असून तपास कामी पोलीसांना मोठी मदत मिळणार आहे.




ना.पंकजाताई मुंडे यांनी परळीकरांच्या या जिव्हाळ्याच्या मागणीची पूर्तता केल्यामुळे त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.