सोमवारी अपंग आणि विधवांच्या मानधन तसेच घरकूलासाठी परळी तहसील कार्यलयावर भव्य आंदोलन
परळी वैजनाथ // जागतिक अपंग दिनानिमित्त सोमवारी ३ डिसेंबर रोजी अपंग आणि विधवांच्या प्रतिमाह एक हजार रुपये मानधनासाठी तसेच दोन रुपये किलो गहू व तीन रुपये किलो तांदूळ आणि घरकूलासाठी परळी तहसील कार्यलयावर भव्य आंदोलन व मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन केले आहे अशी माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष डॉ. संतोष मुंडे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
अपंगांच्या समस्यांकडे आणि त्यांच्या मागण्यांकडे शासनाकडुन जाणीव पूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याच्या निषेधार्थ आणि त्यांच्या विविध मागण्यांसाठी ३ डिसेंबर सोमवार रोजी सकाळी १० वाजता जागतिक अपंग दिनानिमित्त राज्याचे विरोधी पक्षनेते ना. धनंजयजी मुंडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व अपंगांचे कैवारी तथा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष *डॉ. संतोष मुंडे* यांच्या नेतृत्वाखाली परळी तहसील कार्यालयावर भव्य आंदोलन व मोफत आरोग्य तपासणी केली जाणार आहे.
या आंदोलनातील प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे आहेत :-
१) शासन निर्णयानुसार अपंगांना ४०% पेक्षा जास्त अपंगत्वाचे प्रमाणपत्र असणाऱ्यांना ८०० रुपये प्रतिमाह व ८०% पेक्षा जास्त अपंगत्वाचे प्रमाणपत्र असणाऱ्यांना १००० रुपये प्रतिमाह पगार त्वरित चालू करण्यात यावा.
२) शासन निर्णयानुसार अपंग, विधवांना रेशनसाठी अंत्योदय मध्ये समाविष्ट करून २ रुपये किलो गहू आणि ३ रुपये किलो तांदूळ प्रमाणे प्रति महा ३५ किलो रेशन देण्यात यावे.
३) अपंग आणि विधवांची तहसील मध्ये होणारी हेळसांड थांबविण्यात यावी.
४) अपंगांना दिला जाणारा ५% निधी त्वरित वाटप करण्यात यावा.
५) अंबाजोगाई तालुक्यातून परळी तालुक्यात समाविष्ट झालेल्या मालेवाडी गावातील ६० लोंकांचे संजय गांधी पगार त्वरित वाटप करण्यात यावा.
६) विधवा, परितेक्त्या, अपंग, मूकबधिर यांच्या घरकुल योजनेसाठी वेगळी तालुका समिती स्थापन करण्यात यावे.
अशा या भव्य आंदोलनास तालुक्यातील सर्व अपंग ,अंध,मूकबधिर बांधवांनी व विधवा भगिनींनि जास्तीत जास्त संख्येने आधार कार्ड व आपल्या प्रमाणपत्रांचे झेरॉक्स प्रत घेऊन उपस्थित रहावे आणि हे आंदोलन यशस्वी करावे असे आव्हानं अंध अपंग, मूकबधिर, विधवा, माजी सैनिक संघटनेचे सय्यद सुभान, साजन लोहिया, शेख फिरोज, शेख कादर, अनंतराव लोखंडे, अनंत बापू मुंडे, माणिक जाधव, संतोष आघाव, संजय नखाते, संदेश कापसे, प्रदीप भोकरे, इरफाना शेख, मुबारक शेख, शेख फुया, शेख हारा, शेख मीराज, सरताज खान, उद्धव फड, दत्ता काढे, ममता बद्दर, सुधाकर फड, केशव फड, विमल निलंगे, फुला पालेवाल, साहेबराव पवार, पुष्पा कांबळे, अनंत सौंदळे, दत्ता कराड, संभाजी गित्ते, गजानन मनाळे, पाटलोबा ढाकणे, वैजनाथ थोडके, मयूर शिंदे, बाळासाहेब चव्हाण, मुंजा गित्ते, राजाभाऊ गित्ते, संजय घोबाळे आदींनी केले आहे.
Social Plugin