परळी // . सारडगाव येथील एक अल्पवयीन मुलगी शेतातील मोटार चालु करण्यासाठी गेली असता मुलीला आमिष दाखवून मोटारसायकलवर जबरदस्तीने पळवून नेल्याचा प्रकार परळी तालुक्यातील सारडगाव येथे घडला आहे.
आरोपी विरोधात पिडित मुलीच्या वडीलांच्या फिर्यादीवरून परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
दोन दिवसांपूर्वीच परळी तालुक्यातील कान्हेरवाडी येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली होती. तील आरोपीला परळी ग्रामीण पोलिसांनी अटकही केली होती. त्यानंतर दोनच दिवसांत लागोलाग सारडगाव येथे घडलेल्या घटनेमुळे पुन्हा एकदा परळी तालुक्यात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे दोन्ही घटनेतील पीडित अल्पवयीन आहेत आणि या आठवड्यातील बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार दाखल झालेला हा दुसरा गुन्हा आहे परळी ग्रामिण पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार श्रीकृष्ण आत्माराम नागरगोजे (वय १९) व त्याचा चुलतभाऊ मुंजाजी तुकाराम नागरगोजे (वय २७) अशी आरोपींची नावे असून दोघेही परळी तालुक्यातील नागापुर येथील रहिवाशी आहेत. पोलिसांनी दोघाही आरोपींना काल 22 डिसेंबर रोजी ताब्यात घेतले. सदरील आरोपीवर भारतीय दंड संहितेच्या कलम 376, 363, 366(अ),507,34 सह बाल लैंगिक प्रतिबंध संरक्षण कायद्याचे कलम 4, 8, नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींना कोर्टासमोर हजर केले असता त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सदर प्रकरणाचा अधिक तपास परळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विकास आडे करीत आहेत.
Social Plugin