दिल्ली // देशातली सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियानं एटीएममधून पैसे काढण्याचे आणि भरण्याच्या नियमांमध्ये बदल केला आहे. SBIनं ग्राहकांना 31 ऑक्टोबरला दिवसभरात फक्त 20 हजार रुपये काढण्याची मर्यादा घालून दिली आहे. तत्पूर्वी तुम्हाला 40 हजार रुपये काढता येत होते. नियम बदलल्याची माहिती बँकेनं ट्विटर हँडलवरून दिली आहे. तसेच ग्राहकांना एसएमएसही पाठवण्यात आला आहे.
प्रिय ग्राहक, क्लासिक आणि मेस्ट्रो कार्डाच्या 40 हजार रुपयांची मर्यादा कमी करून 20 हजार रुपये करण्यात आली आहे. हा नियम 31 ऑक्टोबरपासून लागू होणार आहे. तसेच एटीएममध्ये कॅश भरण्याची मर्यादाही 30 हजार रुपये होती. आता एसबीआयनं नव्या योजनेंतर्गत ग्राहकांना पैसे जमा करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यावर कोणतंही अतिरिक्त शुल्क लागणार नाही. एसबीआयच्या माहितीनुसार, प्लॅटिनम कार्ड ग्राहक एका दिवसात 1 लाख रुपयांपर्यंत पैसे काढू शकतात. एसबीआयचा ग्राहक बँकेतल्या आता कोणत्याही शाखेत जाऊन पाहिजे तेवढे पैसा जमा करू शकतो. तसेच चालू खात्यातील ग्राहकालाही प्रतिदिन 2 लाख रुपये जमा करता येणार आहेत.
एसबीआयनं मार्च 2018 पर्यंत बँकेने 39.50 कोटी डेबिट कार्ड जारी केले आहेत. यातील 26 कोटी कार्ड सध्या वापरात आहेत. अर्थात, बँकेच्या अन्य कार्डवर या नियमांचा परिणाम होणार नाही. उदाहरणार्थ, एसबीआय गोल्ड, प्लॅटिनम डेबिट कार्डची रक्कम काढण्याची मर्यादा क्रमश: 50 हजार आणि 1 लाख रुपये आहे. क्लासिक व माइस्ट्रो कार्डची रोजची रक्कम काढण्याची मर्यादा 31 ऑक्टोबरपासून 40 हजारांहून घटवून 20 हजार करण्यात येणार आहे.
जर आपल्याला अधिक रकमेची गरज भासत असेल तर, दुसऱ्या श्रेणीतील कार्डसाठी अर्ज करावा, असे बँकेने स्पष्ट केले आहे. एटीएम व्यवहारात फसवणुकीच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे हा निर्णय घेण्यात येत आहे. तसेच, कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आल्याचे बँकेने स्पष्ट केले आहे.
Social Plugin