Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

आयकर विभागाची लातुरात धडक कारवाई ; वैद्यकीय क्षेत्रात खळबळ


लातुर//आयकर विभागाची लातुरात धडक कारवाई ... तीन हॉस्पिटल वर दुपार पासून धाडसत्र सुरु .. तीन पेक्षा जास्त पथक लातुरात दाखल . लातूरच्या वैद्यकीय क्षेत्रात आज दुपारी खळबळ निर्माण झाली आहे .. कारण लातूर शहरातील प्रसिद्ध अश्या श्वास हॉस्पिटल,अल्फा हॉस्पिटल आणि गोजमगुंडे हॉस्पिटल वर दुपारी बाराच्या आसपास एकाच वेळी धाडसत्र सुरु करण्यात आले होते ... संध्याकाळ पर्यंत हे धाडसत्र सुरूच होते .. एकूण तीन पथक आलया ची माहिती मिळते आहे .. औरंगाबाद आणि इतर ठिकाणावरून हे पथक लातूर शहरात दाखल झाले होते .. या धाडी बाबत अतिशय गुप्तता पाळण्यात येत होती ... आयकर विभागाच्या पथकात नेमके किती लोक आहेत ?काय तपासणी करण्यात आली ? याची माहिती देण्यास अधिकाऱ्यांनी नकार दिला आहे .. या प्रत्येक हॉस्पिटल मधील हिशोबाचे सर्व कागदपत्रे या पथकांनी ताब्यात घेतली आहेत ... पोलीस हे बाहेर पहारा देत होते ...शहरातील प्रसिद्ध असलेला मुलाचा दवाखाना श्वास हॉस्पिटल वर ज्यावेळी धाड पडली लहान मुलाचे आणि नवजात शिशु अतिदक्षता हॉस्पिटल असलेल्या गोजमगुंडे हॉस्पिटल वर सकाळी अकरा वाजता आयकर विभागाचे अधिकारी दाखल झाले .. . डॉ दिनेश वर्मा संचलित अल्फा अतिदक्षता हॉस्पिटल वर हि धाड पडली आहे ...