Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

बीड जिल्ह्यात स्वाईन फ्लूचे रुग्णात वाढ



 युसूफवडगाव //: जिल्ह्यात स्वाईन फ्ल्यूचे आणखी एकचा मृत्यू झाला असून या आजाराने मृत्यू झालेल्यांची संख्या आता तीन आहे. गुरुराज रंगनाथ थळकरी (वय 65, रा. युसूफवडगाव, ता. केज) असे मृत्यू झालेल्या रुग्णाचे नाव असून त्यांच्यावर लातूरच्या एका खासगी रुग्णालयात मागच्या 16 दिवसांपासून उपचार सुरु होते. बीड जिल्ह्यात मागच्या पंधरवाड्यापासून स्वाईन फ्लूचे रुग्ण वाढले आहेत. सध्या जिल्हा रुग्णालयात पाच रुग्णांवर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान, युसूफवडगाव येथील गुरुराज रंगनाथ थळकरी यांना ताप वाढल्याने त्यांना १६ दिवसांपूर्वी लातूरच्या एका खासगी रुग्णालयात शरिक करण्यात आले. तिथे त्यांची प्रकृती अधिकच खालावल्याने शुक्रवार - शनिवारच्या मध्यरात्री त्यांना कार्डियाक  अॅम्ब्युलन्समधून औरंगाबादला हलविण्यात येत होते. मात्र, वाटेत त्यांची प्रकृती अधिकच खालावल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात नेले. अॅम्ब्युलन्समध्ये त्यांची नाडी पाहीली असता त्यांचा मृत्यू झालेला होता. दरम्यान, आतापर्यंत मृत्यू झालेले तिघेही खासगी रुग्णालयांत उपचार घेत होते. यापूर्वी केज तालुक्यातील स्वाईन फ्ल्यूने मृत्यू झालेला गोटेगाव येथील रुग्णावर सोलापूरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. तर, बीडमध्येच एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या रुग्णाला स्वाईन फ्ल्यू असल्याचे मृत्यू पश्चात लक्षात आहे.

दरम्यान, जिल्ह्यातील स्वाईन फ्ल्यू साथीची राज्याच्या आरोग्य विभागाने दखल घेत शुक्रवारी (ता. 5) रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांची भेट घेऊन आढावा घेतला.