Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

पञकाराचे घर पेटवून देण्याचा भेकड प्रयत्न ज्यांनी केला त्या गावगुंडांनी तात्काळ अटक करा

पञकारअशा दहशतवादाला  भीक घालणार नाहीत
रिपोर्टरने आजपर्यंत सत्याची बाजू लावून धरत लिखाण केलं आहे आणि यापुढेही करणार. अशा दहशतवादाला रिपोर्टर भीक घालणार नाही. धनंजय याचे घर पेटवून देण्याचा भेकड प्रयत्न ज्या कोणी केला त्यांना आम्ही एवढच सांगतो हे अती होतय. हा दहशतवाद खपवून घेतल जाणार नाही. पोलिस प्रशासनाने या प्रकरणातील आरोपींच्या मुसक्या तात्काळ बांधाव्यात.
००००


 बीड// सायं. दैनिक बीड रिपोर्टरचे सहसंपादक धनंजय गुंदेकर यांच्या घराच्या दरवाज्यावर पेट्रोल टाकत दरवाज्यासमोरची पायपुसणी पेटवून देऊन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न काहींनी केल्याची घटना मध्यरात्री अडीचच्या सुमारास घडली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून हे कृत्य करणार्‍या गुंडांना तात्काळ गजाआड करण्याची मागणी सर्वस्तरातून होत आहे.
धनंजय गुंदेकर हे शहरातील शिवाजीनगर भागामध्ये आपल्या कुटुंबियासमवेत गेल्या काही दिवसांपासून राहतात. रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास अज्ञात गुंडांनी घरासमोर जावून त्यांच्या दरवाज्यावर पेट्रोल ओतले. दारात असलेल्या पायपुसणीला आग लावली. आगीमुळे घरात धूर निघू लागल्याने गुंदेकर यांच्या लक्षात आले. त्यांनी आतमधून पाणी दरवाज्याच्या फटीतून टाकण्याचा प्रयत्न केला. गुंदेकर आतमधून पाणी टाकत होते तर बाहेरुन गुंड दरवाज्यावर आणि त्या पायपुसणीवर पेट्रोल ओतत होते. हा प्रकार तब्बल १० मिनिट चालला. त्यानंतर गुंदेकर यांच्या पत्नीने शेजारच्यांना उठवलं. गल्लीतील लोक जागे होत असल्याचे पाहून अज्ञात गुंड घटनास्थळावरून पसार झाले. या घटनेची माहिती तात्काळ शिवाजीनगर पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. या प्रकरणी अज्ञात गुंडांविरोधात शिवाजीनगर पोलिसात तक्रार देण्यात आली आहे. पेपरमध्ये जास्त लिहितो का? असे म्हणत गुंडांनी केला. कारण ते जेव्हा पेट्रोल ओतत होते तेव्हा असच बोलत होते. सदरचा प्रकार अत्यंत गंभीर असून प्रश्‍न विचारणार्‍यांना, पत्रकारिता करणार्‍यांना अडवण्याचा, धमकवण्याचा आणि दहशत माजवण्याचा हा प्रयत्न असल्याने असा दहशतवाद माजवणार्‍या गुंडांना तात्काळ अटक करण्याची मागणी होत आहे.