Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

स्कॉर्पिओ गाडी दुभाजकाला धडकून अपघात; दोन महिलांचा जागीच मृत्यू


दोन महिलांचा जागीच मृत्यू
नगर- धारवाडी तालुका पाथर्डी येथील गोरे कुटुंबीय स्कोर्पिओ या गाडीतुन कायगाव टोकाच्या दिशेने जाण्यासाठी निघाले होते. ही घटना नगर-औरंगाबाद महामार्गावर पांढरीपुल येथे घडली या स्कॉर्पिओ गाडी वरील ताबा सुटल्याने ती  दुभाजकाला धडकून झालेल्या अपघातात .   गाडी दुभाजकाला धडकून झालेल्या अपघातात दोन महिलांचा  जागीच मृत्यू झाला. तर चार जण जखमी झाले जखमींना नगरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती एम आय डी सी पोलिसांनी दिली . धारवाडी तालुका पाथर्डी येथील गोरे कुटुंबीय स्कोर्पिओ या गाडीतुन कायगाव टोकाच्या दिशेने जाण्यासाठी निघाले होते. त्यावेळी रस्त्याच्या दुभाजकावर त्यांची गाडी वेगाने आदळली. या अपघातात गाडीतील उज्ज्वला अशोक गोरे वय 45 वर्षे आणि अनिता संजय गोरे या दोन महिलांचा मृत्यू झाला.या गाडीमध्ये बाबासाहेब आबाजी गोरे, निलेश पोपट गोरे ,अशोक भिकाजी गोरे ,संगीता विक्रम गोरे हे जखमी झाले त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.