Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

दररोज योगासने केल्यामुळे मन व शरीर निरोगी राहते - एस .के. निर्मळे


अंबाजोगाई // तालुक्यातील वाघाळा परिसरातील सिनर्जी पब्लिक स्कूलमध्ये आयोजित तालुकास्तरीय योगासन स्पर्धेचे उद्घाटन श्री. निर्मळे यांनी दीपप्रज्वलन करून केले . त्या प्रसंगी ते बोलत होते . दररोज योगासने केल्यामुळे शरीर निरोगी रहाते , असे प्रतिपादन जेष्ठ क्रीडाशिक्षक एस .के. निर्मळे यांनी केले .
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या भाविका शहा होत्या . प्रमुख पाहुणे म्हणून योग शिक्षक प्रा .ए.एस. फटांगरे , झानेश्वर जाधव , समन्वयक दत्ता देवकते, किरण कुमार सोन्नर उपस्थित होते .
श्री .निर्मळे म्हणाले, योगासनाचे आपल्याला मोठे फायदे होतात . त्यास आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनविण्याची खरी गरज आहे .
सुरुवातीला समन्वयक दत्ता देवकते प्रस्ताविक
केले .पाहुण्यांचे स्वागत विजय फड , कृष्णा जगताप , प्रदीप वाहूळ यांनी केले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून हर्षवर्धन आगळे यांनी सर्वांचे आभार मानले . या स्पर्धेत चौसष्ट स्पर्धकांनी सहभाग घेतला होता .