एकत्र कुटुंब पद्धतीचा अवलंब केल्यास अनेक नागरिकांचे प्रश्नसुटतील.-.
भोकर // आई , वडील आणि जेष्ठ नागरीक हा घराचा, समाजाचा महत्वपुर्ण घटक असतात त्यांच्या व जेष्ठ नागरिकांच्या समस्यामध्ये वाढ होत असुन त्याचा अप्रत्यक्ष परिणाम जेष्ठ नागरीकांच्या पोषण व आरोग्यावर होत आहे. जेष्ठ नागरीक हा समाजाचा महत्वपुर्ण घटक असल्याने जेष्ठ नागरीकांचे राहणीमान सुसाह्य व्हावे, आरोग्याच्या सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात त्यांच्या पालन पोषणाची जबाबदारी व जेष्ठ नागरीकांचे अधिकार याची जाणीव समाजाला आणि त्यांच्या पाल्यांना होणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन दिनांक २० सप्टेंबर रोजी आयोजीत तालुका विधी सेवा समिती व अभीयोक्ता संघ यांच्या सयुक्त विद्यमाने जेष्ठ नागरिक कायदेविषयक मार्गदर्शन शिबिरात नांदेड जिल्हा न्यायाधीश प्रमुख सुधीरजी कुलकर्णी यांनी यावेळी केले.
या शिबिराचे उद्घाटक मा.सुधीरजी कुलकर्णी प्रमुख जिल्हा न्यायाधीश नांदेड हे होते तर अध्यक्षस्थानी मुजीब शेख जिल्हासत्र न्यायाधीश भोकर हे होते व प्रमुख अतिथि डॉ.हंसराज वैद्य, पोलीस उपविभागीय अधिकारी अभय देशपांडे ,तहसीलदार व्यंकटेश मुंढे,पोलीस निरीक्षक आरएस पडवळ,दिवाणी न्यायाधीश पीए तळेकर, कनिष्ठ स्थर न्यायाधीश एनपि त्रिभुवन, दिवाणी न्यायाधीश एएन पठाण ,प्राचार्य तुंगार, अॅड.सतीश कुंटे, यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना कुलकर्णी असे म्हणले ज्येष्ठ नागरिकांच्या विविध सामाजिक,आर्थिक,आरोग्य, निवास व सुरक्षाविषयक समस्यांची सोडवणूक करणे अत्यंत आवश्यक आहे. या अनुषंगाने ज्येष्ठ नागरिकांना वृद्धापकाळामध्ये आर्थिक क्षमता, कामाचा हक्क,शिक्षणाचा हक्क आणि सार्वजनिक मदत मिळण्यासाठी आपण सर्वानी प्रयत्न करणे गरजेचे आहे. तेव्हा कुठलिही गोष्ठी कायद्याने होत नाही तर प्रत्येकाने मानसिकता बदलली पाहिजे.
या काळात एकत्र कुटुंब पद्धतीचा अवलंब केल्यास जेष्ठ नागरिकांच्या समस्या सुटतील असे शेवटी म्हणाले यावेळी जिल्हा न्यायाधीश सुधीर कुलकर्णी हे येत्या ३० तारखेला सेवानिवृत्त होत असून त्यांचा भोकर विधी सेवा व अभीयोक्ता संघाच्या वतीने मानपत्र देवून येथोचीत सत्कार करण्यात आला यानंतर जेष्ठ नागरिक ओळख पत्र,श्रावणबाळ योजनेचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. प्रस्ताविक अॅड.सतीश कुंटे यांनी केले तर सूत्रसंचालन अॅड.शिवाजी कदम मांडले तर आभार त्रिभुवन यांनी मानले.या कार्यक्रमास बहुसंख्य जेष्ठ नागरिकांची उपस्थिती होती.
जेष्ठ नागरिकांसाठी योजना कोणत्या आहेत,त्या लाभार्थी ना प्रमाणपत्र व नवीन डिजिटल ओळखपत्र वाटप प्रमुख पाहुण्या च्या हस्ते देण्यात आले.श्रावण बाळ योजना चा लाभार्थ्यांना लाभाचे वाटप करण्यात आले
अभवक्ता संघ ,विधी संघ यांच्या मार्फत सत्कार व माणपत्र देण्यात आले.मानपत्राचे वाचन करण्यात आले यावेळी
पूर्वी भारतीय व्यवस्था मध्ये जे कुटुंब होत ते आता नाही
जेष्ठ नागरिक कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर पार पाडण्यास वि.वि. कृष्णावाड,ए.ए. श्रंगारे, ए.वी नेवूळकर, अॅड.आरडी खाडे,अॅड भुजंग सूर्यवंशी,अॅड.शे.मूजाहेद,अॅड शेख अल्तमश,अॅड.दिपक भातलोंडे,अॅड.किशोर राठोड,आदींनी परिश्रम घेतले.
Social Plugin