Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

डॉ दिलीप म्हैसेकर कुलगुरू यांच्या हस्ते दिगंबरराव बिंदू महाविद्यालयाचे प्राचार्य पंजाब चव्हाण यांना वेदन वार्षिक अंकाचा पुरस्कार प्रदान





नांदेड // भोकर च्या नामांकित महाविद्यालयास वेदन या अंकाचा पुरस्कार कुलगुरू डॉ दिलीप म्हैसेकर यांच्या हस्ते नुकताच प्राचार्य पंजाब चव्हाण याना मिळाला त्यावेळी महाविद्यालयातील विज्ञान शाखेचे प्रा.अरविंद चव्हाण,प्रा.तावडे सचिन हे वेदन या वार्षिक अंकाचा पुरस्कार स्वीकारता ना सोबत होते. अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.त्याच बरोबर दि १ ऑक्टोबर ला देखील उत्कृष्ट महाविद्यालय हा पुरस्कार ह्याच महाविद्यालयास मिळणार आहे.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार भोकर येथील नामांकित महाविद्यालय दिगंबरराव बिंदू यांना घोषित झाला असून या पुरस्काराचे  स्वरुप रोख २५ हजार रुपये आणि स्मृतिचिन्ह,सन्मानपत्र आहे.हा पुरस्कार डॉ दिलीप म्हैसेकर(कुलगुरू) यांच्या हस्ते दि १ ऑक्टोबर रोजी  प्राचार्य पंजाब चव्हाण यांना देऊन गौरव करण्यात करण्यात येणार आहे. संस्थेचे अध्यक्ष व सचिव तसेच प्राचार्य डॉ.पंजाब चव्हाण यांच्या  नेतृत्वखाली दिगंबरराव बिंदु महाविद्यालयाने गेल्या काही वर्षांपासून उपक्रमशील महाविद्यालय म्हणून आपला ठसा विद्यापीठ कार्यक्षेत्रात उमटविला आहे.तज्ञ आणि पात्रता धारक प्राध्यापक वर्गाकडून सर्वांगीण शैक्षणिक गुणवत्ता साधण्यासाठी विशेष भर दिला आहे.त्याच बरोबर ह्या महाविद्यालयातील प्राचार्य पंजाब चव्हाण यांना उत्कृष्ट प्राचार्य पुरस्काराने २०१७-२०१८ मध्ये विद्यमान कुलगुरू पंडित विद्यासागर यांच्या हस्ते गौरविण्यात देखील आले होते याचबरोबरच त्यानी महाविद्यालयात इंटरनेट वाय फाय सुविधा,विविध सेमिनारांचे आयोजन,राष्ट्रीय सेवा योजनेचे विविध कार्यक्रम, उपक्रमशील संशोधन कार्य,सर्वांगीण भौतिक सुविधाची उपलब्धता,सुसज्ज खेळाची मैदाने आणि सातत्यपूर्ण विविध खेळांत गुणवत्ता पूर्ण उपलब्धता,विद्यापीठाचे विविध उपक्रम राबविण्यात अालेला पुढाकार,महाविद्यालयातील प्राध्यापक,कर्मचाऱ्यांना विविध उपक्रमात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देणे,सुसज्ज ग्रंथालय आणि स्पर्धा परीक्षेसाठी भरपूर पुस्तके आणि सोई सुविधा,विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सहकार्याने वेगवेगळी कोर्सेस सुरू करणे यासह अनेक उपक्रम राबवून महाविद्यालयाने आपल्या गुणवतेचा ठसा उमटविला आहे.म्हणूनच विद्यापीठाने भोकर च्या नामांकित दिगंबरराव बिंदू महाविद्यालयाची उत्कृष्ट महाविद्यालय म्हणून निवड केलेली आहे.या पुरस्काराचे वितरण दि १ ऑक्टोबर २०१८ रोजी डॉ दिलीप म्हैसेकर कुलगुरू यांच्या हस्ते मिळणार आहे सदरील पुरस्कार मिळनार असल्याबद्दल प्रतिक्रिया देताना प्राचार्य डॉ.पंजाब चव्हाण यांनी पुरस्काराचे श्रेय संस्थेचे डॉ.माधवराव पाटील किन्हाळकर,संस्थेचे संपूर्ण संचालक मंडळ,संपूर्ण प्राध्यापक सहकारी,सर्व कर्मचारी यांनी वेळोवेळी चांगला पुढाकार घेतला आहे त्याचे फळ आहे असे प्राचार्य पंजाब यांनी दूरध्वनी वरून सांगितले.