Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या बीड अधिकाऱ्यांची परळीत धाड मुख्याध्यापक लाच घेताना रंगेहात पकडले


परळी //                                   
           वैद्यनाथ विद्यालयाचे मुख्याध्यापक मोदींना लाच घेतांना आज दि.01 सप्टेंबर रोजी  पकडण्यात आले. बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज सकाळी 11 वाजता ही कारवाई केली. शाळेतील एक प्रकरण दडपण्यासाठी त्यांनी ही लाच मगितल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे.
शाळेचे लिपीक विष्णू लिबांजी सातपुते यांना शिक्षणाधिकारी यांच्या कडील सुनावणीत नाव येऊ  नये तसेच सेवेतुन कमी करु नये यासाठी परळी येथील  वैद्यनाथ माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक मोदी  यांना 1,50,000/- रुपये लाचेची मागणी करून स्वीकारताना आज 1सप्टेंबर रोजी सकाळी अकारा वाजण्याच्या सुमारास  राहत्या निवासस्थानी अचानक साफळा रचुन बीडच्या एसीबी रंगेहात पकडले.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक हनपुडे पाटील, पोलीस निरीक्षक गजानन वाघ, कर्मचारी विकास मुंडे, दादासाहेब केदार, कल्याण राठोड यांनी सदरची सापळा कारवाई केली.