Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

कु. संयुक्ता उर्फ गौरी चौधरीने वक्तृत्त्व स्पर्धेतील प्रथम क्रमांक प्राप्त बक्षीसाची रक्कम दिली केरळ पूरग्रस्तांना.



अंबाजोगाई (प्रतिनिधी) - किल्ले धारुर येथील कै. भास्करराव स्मृती समारोह समितीतर्फे आयोजित आंतरशालेय वक्तृत्त्व स्पर्धेत श्रीमती गोदावरीबाई कुंकलोळ योगेश्वरी कन्या शाळेतील कु.संयुक्ता उर्फ गौरी दुर्गादास चौधरी ही ने "माझे दैवतुल्य आई - बाबा" या विषयावर भाषण करुन 21 शाळांतील सहभागी 42 विद्यार्थ्यांमधून प्रथम क्रमांक बक्षीस प्राप्त केले.  बक्षीसात स्वरुपात मिळालेली रक्कम  रु. 701 तिने केरळ येथील ती  पूरग्रस्तांना समर्पित केली याच शाळेतील श्रावणी निर्मळे व गौरी पन्हाळे यांनी धारूर येथे आयोजित वादविवाद स्पर्धेत उत्तेजनार्थ पारितोषिक मिळविले . या स्पर्धेचे विषय " खरच भारत देशाची सर्वांगीण उन्नती होत आहे किंवा नाही " असा होता . या सर्व विद्यार्थिनींनी आपल्याला मिळालेल्या बक्षिसांची रक्कम केरळ पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्याध्यापिकाकडे जमा केली ...  या तिच्या कौतुकास्पद निर्णयामुळे संस्थाचालक, मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक व शिक्षकांनी  गुणी विद्यार्थीनीचा अभिमान वाटला. तहसिलदार, शिक्षणाधिकारी,  व इतर अनेकांनी  तिच्या यशाबद्दल अभिनंदन  आणि सर्वांना तिच्या या निर्णयामुळे तिचे कौतुक केले
एवढ्या लहान वयात एवढी समज, परिस्थितीचे गांभीर्य व जाण असणारी संयुक्ता ही आत्तापासूनच भाषण करण्यात एकदम तरबेज आहे. भाषणातील आपले मुद्दे ओजस्वी वाणीने प्रभावीपणे मांडण्याचे कसब तिच्या अंगी आहे.
यावेळी बोलताना मुख्याध्यापिका म्हणाले  की, तिच्या व्यक्तीमत्त्वात साहस, निर्भयता, सभाधीटपणा व सुस्पष्ट आवाज आणि विषयज्ञान हे सर्व गुण प्रकर्षाने जाणवतात. त्यामुळेच 21 शाळेतील 42 विद्यार्थी स्पर्धक तिच्या सोबत सहभागी असतानाही त्यातून प्रथम क्रमांक प्राप्त केला ते तिच्यात असलेल्या गुणांमुळे व तिला मिळोलेल्या मार्गदर्शनामुळेच.
या तिच्या प्रथित यशाबद्दल व तिच्या निर्णयासाठी सर्वत्र तिचे कौतुक होत आहे. हा तिचा आदर्श प्रत्येक विद्यार्थ्याने घ्यायला पाहिजे.