Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

वाढदिवसाच्या निमित्तानं निराधारांना केले जीवनावश्यक वस्तुंचे वाटप



अंबाजोगाई // येथील युवा सामाजिक कार्यकर्ते हंसराज कमलाकर देशमुख यांनी आपला मुलगा यशराज याच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन  शहर आणि परिसरात हाल अपेष्टात जीवन जगत असलेल्या निराधारांना जीवनावश्यक वस्तुंचे वाटप  केले या दिशादायी उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या प्रसंगी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. द्वारकादास लोहिया, बनेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अंकुश काळदाते, डॉ.नरेंद्र काळे,हंसराज देशमुख, पत्रकार राहुल देशपांडे, प्रविण दामा, गोविंद टेकाळे  आदी उपस्थित होते
 या प्रसंगी बोलताना डॉ. लोहिया म्हणाले की, विविध योजना निराधार,आर्थिकदृष्टया गरीब असलेल्या नागरिकांसाठी आहेत त्याचा लाभ घेता यावा यासाठी विषेश प्रयत्न करताना जनसहयोगला अनेकांचे सहकार्य असते
जनसहयोगचे उपक्रम हे तळागाळातल्या लोकांसाठी महत्वाचे असतात त्यातुनच प्रेरणा घेऊन मुलाच्या जन्मदिनी अनाठायी खर्च टाळुन चांगल्या उपक्रमात सहभागी होण्याचे भाग्य लाभल्याचे हंसराज देशमुख यांनी सांगितले
वंचित घटकांना न्याय देण्याची भुमिका जनसहयोगने घेतली हाच मानवतावाद असल्याचे काळदाते  यांनी सांगितले
पत्रकार राहुल देशपांडे यांनी सांगितले की,आपल्या कार्याची वेगळी छाप असलेल्या जनसहयोग ने दिलेला निराधारांना दिलेला आधार महत्वपुर्ण आहे त्यातुन अनेकांना प्रेरणा मिळते.
डॉ. नरेंद्र काळे,प्रविण दामा  यांनी उपक्रमाचे कौतुक केले मान्यवरांच्या उपस्थितीत निराधारांना जीवनपयोगी वस्तुंचे वाटप करण्यात आले. उपस्थितांचे स्वागत संजना आपेट,सावित्री सगरे यांनी केले शाम सरवदे यांनी संचलन करून आभार मानले.