परळी// विद्यार्थ्यांनी अभ्यासाचे कधीही टेन्शन घेवू नये, अभ्यासात एकाग्रता करून तणावमुक्त वातावरणात अभ्यास करून परिक्षा दिल्यास अपेक्षित यश प्राप्त होते,विद्यार्थ्यांनी स्पर्धा इतरांशी न करता स्वतःशीच करावी तरच हमखास यश मिळेल असे प्रतिपादन लातूरच्या राजर्षी शाहु सायन्स ज्युनिअर कॉलेजचे ऍकेडेमीक काऊंस्लर प्रा.डॉ.बसवराज खुब्बा यांनी व्यक्त केले.
श्री वैद्यनाथ देवस्थान ट्रस्ट, लिंगायत समाज व भक्तगण यांच्या संयुक्त विद्यमाने वसुंधरारत्न, राष्ट्रसंत ष.ब्र.108 डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर यांच्या 82 व्या श्रावणमास तपोनुष्ठान सोहळा सुरू असून त्यात आज गुरूवार दि.23 ऑगस्ट रोजीच्या व्याख्यानमालेत डॉ.बसवराज खुब्बा बोलत होते. आजच्या शैक्षणिक व्याख्यानास विद्यार्थी व पालकांची मोठी उपस्थिती होती.
यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना डॉ.बसवराज खुब्बा म्हणाले की, विद्यार्थ्यांनी वेळेवर व शांतपणे अभ्यास करावा, विद्यार्थ्यांनी आपल्या मित्रांसोबत चांगले रहावे, परिक्षेची भिती बाळगू नये, परिक्षेत मार्क कमी पडतात म्हणून रडायचे नाही तर मार्क का पडत नाहीत यावर विचार करावा व नियमित व सातत्याने अभ्यास करावा असे डॉ.बसवराज खुब्बा यांनी संागितले.अनुष्ठान सोहळयात राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमपुरकर यांच्या दर्शनासाठी मराठवाड्याबरोबरच आंध्रप्रदेश व कर्नाटक या शेजारच्या राज्यातूनभाविक परळीत येत आहेत. अनुष्ठान सोहळयाच्या निमित्ताने परिसरातील भाविक दिंडया-पालख्या घेवून पायी दर्शनासाठी येत आहेत. महिला दिंडी सोबत फुगड्या खेळून वातावरणात उत्साह निर्माण करीत आहेत. श्रावणमास तपोनुष्ठान सोहळयाचे अध्यक्ष चेतन सौंदळे आपल्या सहकार्यांसह परिश्रम घेवून कार्यक्रमात कुठेही कमी पडू नये याची दक्षता घेत आहेत. यावेळी वीरशैव सखी सहेली महिला ग्रुपने भोजन व्यवस्थेतील यशस्वी योगदान घेत असल्याबद्दल त्यंाचे स्वागत करून त्यांच्या हस्ते आरती करण्यात आली.
व्यासपीठावर प्रसिद्ध कॉन्ट्रॅक्टर व भक्तीस्थल अध्यक्ष शंकरआण्णा मोरगे पाटील, नवगण कॉलेजचे प्राचार्य प्रा.डॉ. आर. एस. बांगड, जवाहर कॉलेजचे प्राचार्य बी.डी.मुंडे, अ.भा.वारकरी मंडळाचे विभागीय अध्यक्ष ह.भ.प.रामेश्वर महाराज कोकाटे, वैद्यनाथ विद्यालय मुख्याध्यापक नंदकिशोर मोदी, ज्ञानबोधिनी विद्यालायचे मुख्याध्यापक लक्ष्मण मुंडे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक रंगनाथअप्पा खके, भागवतराव अघाव, डॉ.शिभप भगवंतराव पाटील, शिभप शिवराज नावंदे, शिभप गोरोबाकाका, ज्येष्ठ मार्गदर्शक दत्ताप्पा ईटके गुरुजी, ऍड राजेश्वर देशमुख,पत्की सर आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्तविक जी.एस.सौंदळे यांनी केले. यावेळी उपस्थित मान्यवरांचा पुष्पहार व स्मृतीचिन्ह देवून सत्कार करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्रावणमास तपोनुष्ठान समितीचे अध्यक्ष चेतन सौंदळे, अशोक नावंदे, सोमनाथ गोपनपाळे, चंद्रकांतअप्पा उदगीरकर, कैलास भीमाशंकरअप्पा रिकीबे, प्रा.अमर आलदे, संतोष पंचाक्षरी, सोमनाथअप्पा निलंगे, गिरीश बेंबळगे,गिरीश नरवणे, संतोष जुजगर यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अशोक नावंदे यांनी तर आभार प्रदर्शन कैलास भीमाशंकरअप्पा रिकीबे यांनी मानले.
*लाईफ केअरने दिले दृष्टीचे दान*
परळी येथे चालू असलेल्या राष्ट्रसंत ष.ब्र.108 डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर यांच्या 82व्या श्रावणमास तपोनुष्ठानाच्या पार्श्वभूमीवर तीन टप्प्यात नेत्र शस्त्रक्रिया पार पडले. या शिबीरात रूग्णांची मोफत तपासणी करण्यासोबतच त्यांना चष्म्याचे वाटप करण्यात आले. अनुष्ठानाचा कार्यक्रम धार्मिक असतांनाही सामाजिक संवेदना जपण्यासोबत संयोजकांनी आरोग्याचीही जबाबदारी उत्तमरित्या पार पाडली. त्यामुळे शिबीरातील आगळया वेगळया कार्यक्रमांची चांगलीच चर्चा होत आहे. लाईफ केअरच्या पथकाने अत्यंत काळजीपूर्वक तपासणी तज्ञ डॉक्टरांमार्फत करून आणली.
Social Plugin